विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच “शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी …
Read More »शिवरायांकृत रामदासांना पत्र आणि वास्तव
रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने “श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन” हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे. त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मवृंद आहोत हे तो विसरलेला नाही. सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. …
Read More »जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी….. ??
संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट आणि त्याचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले क्षेपक …
Read More »महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज
संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतांचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]
तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा : आपण हे क्षणभर धरून चाललो की “संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥” असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते. तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]
संशोधनापुढे ध्येय : तुकोबारायांची “ब्रह्मरुप काया” ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे, देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये. पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणाऱ्यांनी कळत-नकळत केला. तो हाणून पाडणे हेच काय …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]
साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र. ११२ वर म्हंटले आहे “ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे हृदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे, कारण ते सर्व थराथरात गेले.” संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात “तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणाऱ्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा …
Read More »प्राचीन समाज व्यवस्था, संत साहित्य व भारतीय राज्य घटना [१]
तज्ञांच्या मते अंदाजे दोनशे कोटी वर्षापुर्वी पृथ्वीची निर्मिती झाली. डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतानुसार अंदाजे दोन कॊटी वर्षापुर्वी प्रथम जीव जन्माला आला. अंदाजे वीस लक्ष वर्षापुर्वी मानव प्राणी आस्तित्वात आला. पृथ्वीच्या निर्मीती पासून आज अखेरचा काळ चार युगांमध्ये विभागला आहे. [१] सत्ययुग/क्रुतयुग-४,३२ लक्षवर्ष, [२] त्रेतायुग-३,३२ लक्षवर्ष. [३] द्वापारयुग-२,३२ लक्षवर्ष व [४] कलीयुग-१,३२ लक्षवर्ष. द्वापार युगारंभी वेदांची निर्मीती झाली. यामध्ये ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद प्रथम लिहिले गेले. कलीयुगारंभी अथर्ववेद लिहिला गेला. यामध्ये एक लक्ष …
Read More »