महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. …
Read More »दादोजी कोंडदेव, छ.शिवाजी महाराज आणि सत्य
”दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य” अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख “लोकसत्ता” मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले “हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण ” याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, “दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती” तसेच “दादोजी यांचं शिवाजी …
Read More »शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?
विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच “शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी …
Read More »छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?
विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात “गोब्राह्मणप्रतिपालक” ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण. “गायींचा” आणि “ब्राह्मणांचा” प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते. मग प्रश्न असा आहे की शिवराय …
Read More »शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी
सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती । अलौकीक विलायतेत किर्ती ॥ जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला । शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार । म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥ राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक दृष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण …
Read More »स्वराज्याची निशाणी : भगवा, शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी
इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास व शिवाजी” या …
Read More »॥ राजा शिवछत्रपती ॥ भाग ३
ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. “मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज” ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे. या पृथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. …
Read More »॥ राजा शिवछत्रपती ॥ भाग २
पुण्यात लालमहालाच्या पश्चिम बाजुला शिवाजी राजे सोन्याच्या नांगराने मशागत करत आहेत आणि शेजारी जिजामाता, शिवबा आणि कोंडदेव यांची शिल्पे दाखवली आहेत. त्या ठिकाणी शहाजी राजेंचे शिल्प नाही. ही शिल्पे महापालिकेची परवानगी न घेता पुरंदरेनी निनाद बेडेकर आणि त्याचा पंत यांच्या साह्याने उभारली आहेत. जेजुरीला शिवाजी राजे – शहाजी राजे भेट होत आहे. अशी शिल्पे आहेत. मतितार्थ हा सांगायचा आहे की, पुण्याहुन शिवाजी राजे, जिजामाता आणि कोंडदेव हे जेजुरीपर्यंत आले आहेत …
Read More »सूर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच !
“कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच. निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते. पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता. हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे. पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी. कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता.” इतिहास हा …
Read More »