वेदोक्त : एक धार्मिक युद्ध

   राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून “वेदोक्त प्रकरणा” कडे पहिले जाते. सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता. “जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥” ही त्यांची विचार व आचारधारा होती. अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे. “ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥तया …

Read More »

राजर्षी छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे “आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. “एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील “शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले …

Read More »

पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा

   पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती. या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता. परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते. या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की “पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? ” ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती. संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त “मराठा” शब्दाचा आधार घेतला जातो. याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच. …

Read More »

रा.ग. गडकरींचा राजसंन्यास

   कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात. कुणी समाज प्रबोधनासाठी, कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो. पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण …

Read More »

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

   राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? : पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले. परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही. कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन. चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु. भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा …

Read More »

सूर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच ! [भाग ३]

   मुत्सद्दी राणी येसूबाई : रायगडाबाबत धोरणी, निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला. पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मराठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही. सूर्याजींचे नावही तेथे नाही. जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला. शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले. बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले आणि त्यास …

Read More »

सुर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच ! [भाग २]

   पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते : आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली, पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही. शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते. ’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’. राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल. वेढा आरंभी अगदीच शिथील होता. संपुर्ण रायगडला वेढा देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते. …

Read More »

सूर्याजी पिसाळ – फ़ितूर नव्हेच !

“कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच. निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते. पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता. हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे. पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी. कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता.”    इतिहास हा …

Read More »