महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. …
Read More »दादोजी कोंडदेव, छ.शिवाजी महाराज आणि सत्य
”दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य” अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख “लोकसत्ता” मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले “हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण ” याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, “दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती” तसेच “दादोजी यांचं शिवाजी …
Read More »शिवरायांकृत रामदासांना पत्र आणि वास्तव
रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने “श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन” हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे. त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मवृंद आहोत हे तो विसरलेला नाही. सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]
तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा : आपण हे क्षणभर धरून चाललो की “संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥” असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते. तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य …
Read More »संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]
संशोधनापुढे ध्येय : तुकोबारायांची “ब्रह्मरुप काया” ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे, देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये. पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणाऱ्यांनी कळत-नकळत केला. तो हाणून पाडणे हेच काय …
Read More »शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी
सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती । अलौकीक विलायतेत किर्ती ॥ जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला । शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार । म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥ राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक दृष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण …
Read More »प्राचीन समाज व्यवस्था, संत साहित्य व भारतीय राज्य घटना [२]
सर्वधर्मसमभाव म्हणोनी कुळजाती वर्ण । हे अबघेचि गाअकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ – ज्ञानदेव (ओ.४५६)त्या प्रमाणे क्षत्रिय,वैश्य स्त्रिया,पापी,अत्यंत,शुद्र अंगणा,जर मला भजत असतील तर ते माझेच आहेत. – (ओ.४७४) याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून आणू नये ॥ – ज्ञानदेव फ़ड, दिंडी, टाळ, भजन, कीर्तन, हरीकथा, पताका, तुळस,कळस व वारकरी यांच्या प्रती अतूट श्रद्धा बाळगणे आवश्यकसंत वाडमय ही समतेची शिदोरी जगकल्याणासाठी आहे.ज्ञानमेवाम्रुतम – ज्ञानासारखे पवित्र व …
Read More »स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले
काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणाऱ्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात. भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानामृताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे. त्यांच्यामुळेच “अगं सोनू,अरे पिल्या, अरे बाळा लवकर उठ, शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे. लवकर उठ.” अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला …
Read More »मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा
इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक कथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत. एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे “महात्म्य” प्रसिद्ध केले जाते, त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासांच्या चरित्रातही घुसडलेल्या पाहायला मिळतात. गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याचशा रामदासांच्या चरित्रात आलेल्या पाहायला मिळतात. या रामदासी कथांबद्दल लिहिताना “न.र.फ़ाटक” यांनी आपल्या “रामदास …
Read More »