कलेचा , लेखनीचा, आपल्या प्रतिभेचा व आपल्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकजन विशिष्ठ हेतूने करीत असतात. कुणी समाज प्रबोधनासाठी, कुणी आपल्या सोबत सर्व मानवांचे भले होण्यासाठी कलेचा कलेचा प्रभावी वापर करत असतो, तर कोणी इतिहासाची सत्याशी इमान राखुन ऐतिहासिक महापुरुषांनी दिन-दुबळ्यांसाठी, बहुजनांसाठी केलेल्या कार्याची नोंद करून ठेवण्यासाठी व पुढील पिढीस त्या महापुरुषांकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी आपल्या कलेचा, आपल्या प्रतिभेचा वापर करत असतो. पण या भारताचे दुर्भाग्य असे की, भारतातील अनेक ब्राह्मण हे बहुजन महापुरुषांचे कार्य दुषित करण्यासाठी व या महापुरुषांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा व प्रोत्साहन मिळु न देण्यासाठी उलटपक्षी या महापुरुषांची बदनामी करण्यासाठी आपली कला, प्रतिभा, लेखनी वापरत असल्याचे अनेक वेळा जाहीर झाले आहे.
राम गणेश गडकरी यांनी “राजसंन्यास” या नावाने एक काल्पनिक नाटक / कथा रचुन या नाटकाआडुन शिवरायांची आणि शिवकुटुंबाची अत्यंत खालच्या पातळीचर जाऊन बदनामी केलेली आहे. या काल्पनिक नाटकाचा रचनाकार गडकरीने शिवकुटुंबाची बदनामी तर केलीच आहे पण ही बदनामी करण्यासाठी त्यांनी बहुजनांच्या दोन महत्वाच्या प्रतिकांचा / नावाचा वापर केलेला आहे आणि या दोन प्रतिकांची नावे आहेत जिवाजी आणि देहु. जिवाजी हे छत्रपती शिवरायांचे अत्यंत विश्वासू सेवक होते. अफ़जलखाना विरुद्धच्या मोहिमेत शिवरायांसोबत असताना “होते जिवाजी म्हणुन वाचले शिवाजी ” असे इतिहासात जिवाजींच्या शिवप्रेमाची व शौर्याची नोंद आहे. सदर “राजसंन्यास” नाटकात यांच जिवाजी या नावाचा ’जिवाजीपंत’ हे काल्पनिक पात्र रंगवून राम गणेश गडकरी याने बहुजनांना अत्यंत प्रिय असलेल्या ’जिवाजी’ यांचा देखील अपमान केलेला आहे. याच शिवप्रेमी ’जिवाजी’ यांच्या नावाने रंगवलेल्या ’जिवाजीपंत’ च्या तोंडुनच शिवरायांची बदनामी गडकरी यांनी केलेली आहे आणि आपल्या शिवरायद्वेषाची आग शमुन घेतली आहे.

दुसरे व बहुजनांचे अत्यंत प्रिय प्रतिक आहे ते “देहू”, कारण देहू हे जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व कर्मस्थान आहे. धर्मान्ध व्यवस्थेला आपल्या अभंगातून व प्रबोधनातून हादरे देणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे त्यांच्या हयातीपासुनच छळ करणारे जगदगुरु संत तुकाराम महाराजांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. छ.शिवरायांवर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा, वारकरी सांप्रदायाचा व त्या माध्यमातून तुकाराम महाराज चालवत असलेल्या बहुजन मुक्ती चळवळीचा खुप मोठा प्रभाव होता हे जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच राम गडकरीने शिवरायांची बदनामी करण्यासाठी मुद्दामच बहुजनांना अत्यंत आदरणीय असलेल्या शिवगुरु जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा “देहू” या जन्मस्थळाची निवड केली. “देहू” हे संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थळाचं म्हणजे एका गावाचे नाव आहे. मागील हजारो वर्षाच्या इतिहासात “देहू” हे एखाद्या व्यक्तीचे नाव असल्याचे ऐकिवात नाही.
ही दोन्ही छ.शिवरायांशी जवळीक असलेल्या अत्यंत प्रिय प्रतिकांचा गडकरी ” राजसंन्यास” या नाटकात पात्रांच्या रुपात वापर करून “जिवाजीपंत” व “देहू” यांच्या तोंडून पुढील प्रमाणे छत्रपतींची बदनामी केलेली आहे व ते लक्षात घेण्यासाठी “राजसंन्यास” नाटकातील वरील पात्रांच्या तोंडी बुसडवलेली काही उदाहरणे : १) जिवाजीपंत : शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून मुलखात पुंडाई (बंडखोरपणा, उपद्रव, लुटारूपणा) आरंभली. २) जिवाजीपंत : या कलमाच्या करामतीने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून दाखविता येते ! ३) जिवाजीपंत : सांगु तुला देहू ? कलमाच्या मदतीवाचुन कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला पण खरी करणी त्या रामदासाची आहे. त्याने आपला “दासबोध” ग्रंथ लिहिला नसता , तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना ! शिवाजी भवानी तलवारीने ? नाही तुझ्या आडदांड करेलीने ? नाही ! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते ! आता तुच सांग बघु भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर ? ४) जिवाजीपंत : काय, ग्रंथ केला रे शिवाजीने ? मी म्हणतो तसे म्हंटले तर छत्रपती शिवाजी महराजांनी असे केले आहे तरी काय ?
असे अनेक उद्गार आहेत पात्रांच्या तोंडात गडकरींच्या मेंदूतुन आलेली आहेत. हे तर “राजसंन्यास” आहे की “राजसत्यानास” आहे हे लगेच एका धर्मांध व्यक्तीला देखील समजु शकेल हां आता तो अमान्य करेल ही गोष्ट वेगळी आहे.
तमाम जीवस्रुष्टीला फ़सविण्याचा, ठकविण्याचा, गंडविण्याचा आणि बदनाम करण्याचा ठेका आम्हीच घेतला असल्याचे गडकरी येथे अधोरेखीत करतात. अशा अमानवी , कुविचारी टाळक्यांच्या औलादिंना महात्मा फ़ुले “कलमकसाई” का म्हणतात हे यावरून स्पष्ट होते.